दरवर्षी IAS-IPS यशस्वी उमेदवारांचा सत्कार, कौतुक सोहळे होत असतात. पण एक सामान्य माणूस म्हणून मनात प्रश्न उभा राहतो — याआधी सिलेक्ट झालेल्यांनी सिस्टीममध्ये काय दिवे लावले?
भ्रष्टाचार थांबला का?
शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झाली का?
सरकारी सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या का?
अर्थात, काही बोटावर मोजता येतील इतकेच अधिकारी खरंच संवेदनशील आणि प्रेरणादायी काम करतात. पण संख्येने ते फार थोडे.
बहुसंख्य अधिकारी "सिस्टम"चा भाग होतात, परिवर्तनाचे साधन नाही.
पद म्हणजे साधन, काम हीच ओळख.
सत्कार करा, पण अपेक्षा ठेवा—की त्यांच्या कामाने सामान्य माणसाचं जीवन सुलभ होईल. कारण बदल हे सन्मानाने नव्हे, कामगिरीने सिद्ध होतात