आहेस ना व्यवस्थित?? थकल्यासारखं होतंय का??अरे किती विचार करशील सगळ्या गोष्टींचा? विचार करून करून त्याचा परिणाम तब्बेतीवर होतोय तुझ्या... थोडं स्वतःकडे बघ की काय हाल करून घेतलेत स्वतःचे...बाहेर अभ्यासाला असल्यामुळे घरच्यासारखं चांगलं जेवणही मिळतं नाही तूला हे मला माहिती आहे... अभ्यास महत्वाचा आहेचं रे बाळा पण त्याआधी आम्हा सर्वांना तु जास्त महत्वाचा आहेस त्यामुळे काहीही असलं तरी आधी स्वतःला सांभाळायचं...घरी असशील किंवा बाहेर गावी अभ्यास करत असशील तरी आधी जेवणाकडे आणि थोडं तब्बेतीकडे लक्ष देत जा...मी अभ्यास करताना मला एवढं आपुलकीने कुणी सांगितलं की रडू यायचं राव... अभ्यास करताना फार आपुलकीने बोलणारं कुणी नसतं आपल्याकडे... बराच काळ एकट्याने घालवावा लागतो...नको-नको होतं सगळंच...असो पण एक आहे की परिस्थिती जेवढी आपली मजा घेते ना तर तेवढंचं भरभरूनही देते आपल्याला त्यामुळे प्रामाणिकपणे प्रवास चालू ठेवायचा, थोडा संयम राखायचा आणि हो बाप जेवढे तास रोज उन्हात काम करतो ना तेवढेचं तास तु Library मध्ये सावलीत बसून अभ्यास कर... विजय तुझाचं आहे..!!🌿❤️
@रेवण..