Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Лачен пише
Лачен пише
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Лачен пише
Лачен пише
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 avatar
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 avatar
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨
07.05.202515:08
बारामतीकर..!!❤️
तुम्ही आलात, भेटलात आणि भरभरून प्रेम दिलतं त्यासाठी फार फार आभारी आहे... एवढ्या संख्येने उपस्थित रहाल याची अजिबात अपेक्षा नव्हती पण तुमच्या सर्वांच्या येण्याने खूप आनंद झाला आणि आजचा दिवस सार्थकी लागला... सर्वांना खूप सारं प्रेम आणि शुभेच्छा 🌿

थोडा बदल करून पुन्हा व्हिडीओ टाकतोय 🌿❤️

https://youtube.com/shorts/TafwLltkXE4?si=reDKZR4eNZpREBkY
03.05.202517:09
परीक्षा जवळ येतेय तसं सगळं विसरल्यासारखं होत असेल तूला... कितीही अभ्यास केला तरी आपलं काहीच झालं नाही असंही वाटत असेल... खूप अभ्यास करूनही टेस्ट पेपरला कमी मार्क्स येत असतात आपल्याला आणि तेव्हा तर असं वाटतं की एवढं करूनही का मार्क्स येतं नसतील??... हे सगळं आत्ता तुमच्यासोबत सुरु असेल याची जाणीव आहे मला... हे बघ तुझी धडपड भयंकर आहे म्हणून हे सगळे अनुभव तूला येत आहेत आणि मी एक गोष्ट विश्वासाने सांगेन की तुझा अभ्यास चांगला आहे ना मग परीक्षेत तूला ते आठवणारचं आहे त्यामुळे तु अजिबात टेंशन घेऊ नको...आणि हो तूला काय आठवतंय किंवा कोणी काय विचारल्यावर तूला ते किती येतंय यापेक्षा प्रश्न सामोर आला की तूला उत्तर येतंय की नाही हे अधिक महत्वाचं आहे बस्स..!!🌿❤️

@रेवण..
30.04.202511:50
1 जून गट क पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे🌿

1.शेवटचे 30 दिवस राहिले आहेत त्यामुळे वेळेला सर्वाधिक महत्व दया.

2.निकाल येण्यासाठी इथून पुढे फक्त Revision आणि Practice या दोनचं गोष्टी महत्वाच्या आहेत.

3.Time Management आणि Temperament Management साठी इथून पुढे किमान 10 टेस्ट पेपर वेळ लावून सोडवा (जास्त सोडवले तर उत्तमचं )

4.रोज किमान 200 ते 250 आयोगाचे प्रश्न सोडवून झाले पाहिजेत.

5. राहिलेल्या दिवसात 1-1 मिनिट महत्वाचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त सकारात्मक रहा.. चुकूनही कुठे वेळ जाईल असले कोणतेही प्रकार करू नका.

6.तुमचं स्वतःचं पेपरच्या एक तासाचं नियोजन व्यवस्थित तयार असलं पाहिजे तरचं एवढा अभ्यास केल्याचा फायदा होईल.. कारण 1 तासाच्या नियोजनावरच सगळं अवलंबून आहे.

7. सगळ्यात महत्वाचं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये छान पेपर द्यायचा आहे अशी जबरदस्त मानसिकता तयार करा..

8. आणि हो कोणतीही पूर्वपरीक्षा ही आत्मविश्वासावर अवलंबून असते त्यामुळे आत्मविश्वास टिकवून ठेवा.

खूप खूप शुभेच्छा पोरांनो... शेवटचा घाव ताकदीने घाला बस्स..निकाल आपलाच आहे..!! 🌿❤️

@रेवण..
04.04.202513:40
अडचणी आणि अपयशाला पर्याय नसतो पोरांनो... ते येतंच राहतं... तुम्हाला असा एकही यशस्वी माणूस सापडणार नाही की ज्याला अडचणी आणि अपयशाने छळलं नाही परंतू अशाही परिस्थिती मधून तूला उभं राहता यायला पाहिजे बघ...वारीच्या दिवसात पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्याला किती सहन करावं लागतं पोरांनो?? 48-48 तास त्याला दर्शनासाठी रांगेत उभं रहावं लागतं आणि त्याआधी तो 8-10 दिवस चालत- चालत आलेला असतो, अशाही परिस्थिती मध्ये तो पांडुरंगाला भेटण्याचा हट्ट सोडत नाही आणि शेवटी त्याला पांडुरंगाचं दर्शन होतंच...दर्शन झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचं समाधान असतं ना... आपली पण ही वारीच सुरु आहे असं समजा आणि तुमच्या पांडुरंगाचं (म्हणजेच पोस्ट ) दर्शन घेण्याचा हट्ट सोडू नका.. तुम्हालाही नक्की जग जिंकल्याचं समाधान मिळेल..!!🌿

@रेवण..
गट ब आणि क पूर्व - मुख्य परीक्षेसाठी महत्वाचे..!!

विषय- राज्यशास्त्र
आयोगाच्या आवडीचा मुद्दा आहे.. यावर वारंवार प्रश्न येत असतात. 🌿

खालील लिंकवर जाऊन COMBINE MENTOR चॅनेल Join करू शकता.

https://t.me/combinementortop
19.03.202514:52
दिवसभर अभ्यास करून-करून थकायला होत असेल ना??... किती करायचं आणि किती दिवस करायचं असं सारखं वाटतंय ना तूला?? मलाही वाटायचं...तेचं तेचं करून जीव नकोसा व्हायचा... पण असंही वाटायचं की मोठ्या गोष्टींना थोडा वेळ लागतो आणि त्या खूप कमी लोकांना मिळतात...त्यामुळे काहीतरी भारी मिळवायचं म्हणजे त्यासाठी मेहनत ही भारीच करावी लागते...असो त्रास होतोय...सगळं नको वाटतंय...लोकांचे टोमणे ऐकू वाटेनात... वाढलेल्या वयाची भीती वाटतेय... हे सगळं होतंच असेल तुझ्यासोबत...माझ्यासोबतही झालंय..पण स्थिर रहा... Focus कमी झाला तर सगळं बिघडेल... वाईट परिस्थिती मध्ये आपल्यासोबत जास्तच वाईट व्हायला सुरवात होते पण तू टिकून रहा...काहीही असो सगळ्यात महत्वाचं की 'बाप बोट दाखवेल ती गोष्ट आपल्याला घेता यायला पाहिजे ' किमान इतकं यशस्वी होईपर्यंत लढणं थांबवू नको रे बाळा आणि मी आहेचं तुझा हात धरून त्यामुळे निश्चिंत रहा..!!🌿❤️

@रेवण..
06.05.202513:17
बारामतीकर उद्या 7 मे रोजी VP कॉलेज ग्राउंड वर सकाळी 10 वाजता भेटू 🌿
उद्या वेळेत या सगळे...भेटू, चर्चा करू, कुठं चुकतंय बघू आणि पुढची रणनीती ठरवू 🌿

@रेवण..
02.05.202515:44
झोपायच्या आधी बघून घ्या 🌿
27.04.202515:15
वेळ आहे तर धडपड कर बाळा..बॅग भरून मोकळ्या हाताने घराकडं जाताना भयंकर वाईट वाटतं बघ...मला हे लिहतानाही धडधड होतेय अरे...तु तर हे सगळं अनुभवतोय...असो रात्री झोपताना घरून येणाऱ्या प्रत्येक रुपयाचा हिशोब पूर्ण झालेला असावा एवढी काळजी घे बस्स..!!🌿❤️

@रेवण..
31.03.202516:37
अभ्यास हा महत्वाचा असतोच पोरांनो पण त्याहूनही काय महत्वाचं असेल तर रोज चांगली आणि नियमित अभ्यासाची परिस्थिती टिकवून ठेवणं...नाहीतर 2 दिवस अभ्यास करू वाटतो आणि 4 दिवस काहीच अभ्यास करायचा नाही फक्त मोबाईल वर Reels बघत बसायचं,अशीचं परिस्थिती असेल तर तुमच्या हाती काहीही लागणार नाही.. वेळीचं शहाणं व्हा रे बाळांनो...तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाणं हा माझा कायमचा हट्ट आहे आणि तो मी नेहमी जपेन..!!🌿❤️

@रेवण..
24.03.202516:10
दिवसभर केलेल्या मेहनतीचं समाधान रात्री झोपताना मिळायला हवं एवढी काळजी घ्या बस्स..!!🌿❤️
1 जून गट क पूर्व परीक्षेसाठी Math-Reasoning विषयाचे महत्वाचे टॉपिक 🌿

20 पैकी 17-18 प्रश्न याचं टॉपिकवर असतील.

खालील लिंकवर जाऊन COMBINE MENTOR चॅनेल Join करू शकता.

https://t.me/combinementortop
06.05.202505:58
👉🏻येणाऱ्या 29 जून गट गट ब मुख्य परीक्षेसाठी राज्यशास्त्र विषयाची Strategy आणि महत्वाचे टॉपिक दिले आहेत.. या टॉपिकबाहेर पप्रश्न जाणार नाही.

👉🏻100 मार्क्सचा पेपर समजून विश्लेषण केलं आहे कारण ते समजायला सोपं जातं

👉🏻जेवढं सांगितलं आहे त्याबाहेर काही करू नका... तुमचे मार्क्स जाणार नाहीत.

👉🏻मुख्य परीक्षा अधिकारी बनवते त्यामुळे तिला वेळ दया... तिची काळजी करा आणि ताकदीने अभ्यास करून पेपर दया.. निकाल आपलाच आहे 🌿

https://youtu.be/bxQrvXr2Y7s?si=qYDDnq5m9qt9i13J
02.05.202504:06
https://youtu.be/8xNwquqzIHU?si=0Z1qEPLGPl4pi4Hw

1 जून गट क बाबत थोडक्यात नियोजन सांगितलं आहे आणि गट क पूर्व 2022 मधील राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नांचं विश्लेषण केलं आहे...वेळ मिळाला की बघून घ्या 🌿


By रेवण कदम
25.04.202513:17
कोल्हापुरातला आणि तुमच्या-आमच्यातला बिरदेव IPS झाला कारण त्यानं वाईट परिस्थितीचं भांडवल केलं नाही..बाकी गोष्टी माझ्या नजरेत दुय्यम आहेत..!!🌿❤️

@रेवण..
30.03.202507:45
कुठलाही सण असला तरी त्या दरम्यान आपले महत्वाच्या परीक्षेचे दिवस सुरु असतात आणि अशा परिस्थितीमुळे खूपदा आपले अनेक सण Library मध्येचं अभ्यास करण्यात जातात...माणूस आहे म्हंटल्यावर वाईट वाटतंच आपल्याला पण स्वतःला नेहमी सांगायचं की आपल्या निकालाचा दिवस जवळ येतोय आणि आपले सर्व सण त्याचं दिवशी साजरे होणार आहेत... असो सण-वार येत राहणार आहेत पण गेलेली वेळ परत येत नसते त्यामुळे जोर लावून अभ्यास करा पोरं हो..!!❤️
सर्वांनां गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढच्या वर्षी तुमच्याकडून यशाची गुढी उभारली जावो याचं सदिच्छा..!!🌿

@रेवण...
20.03.202513:01
गट ब आणि क मुख्य परीक्षा 2023 मध्ये आलेल्या इंग्रजी पेपर मधील प्रश्नांची संख्या.. ( topic wise).

29 जूनला होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी महत्वाचे आहे 🌿

खालील लिंकवर जाऊन COMBINE MENTOR चॅनेल Join करू शकता.

https://t.me/combinementortop
06.02.202511:45
केलेल्या मेहनतीचं फळ तूला काल मार्क्सच्या रूपाने मिळालं असेल.. गडबडून जाऊ नकोस... शांत हो... जे वास्तव आहे ते स्वीकार आणि कामाला लाग... पूर्व परीक्षा पास होण्याची खात्री असेल तर मुख्य परीक्षेला लाग.. वेळ वाया घालवू नको...'माझं होईल का??' असं सगळ्यांना विचारत बसू नको...पूर्व परीक्षेत कमी मार्क्स आले असतील तर धीर सोडू नको.. विचार कर,नियोजन कर आणि पुन्हा कामाला लाग कारण खचून गेलास तर संपशील...रडू येत असेल तर रडून घे आणि पुन्हा नव्याने कामाला लाग...चुका सुधार... मी सारखं जीव तोडून सांगत होतो की चुका करू नकोस पण तुझ्याकडून तेचं झालं पण असो इथून पुढे काळजी घे...मोठ्या अपयशानंतरचं यश उभं राहतं हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे..त्यामुळे इतिहास रचण्यासाठी सज्ज हो...काल तुझा पडलेला चेहरा बघून आई-बापाचाही चेहरा पडला असेल ना ?? म्हणून सांगतोय की उठ आणि पुन्हा त्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी धडपड कर... बाकी मी आहेचं की तुझं बोट धरून कायम.. 🌿❤️

@रेवण..
आयोगाने गट क पूर्व परीक्षा 2022 मध्ये 16 व्या घटनादुरुस्तीवर प्रश्न का विचारला आहे याचं सुंदर उत्तर...🌿
हजार वेळा ओरडून सांगत असतो की मागील परीक्षेतील प्रश्न आणि आयोगाने त्याचे पर्याय कसे दिलेत हे बारकाईने बघा.... आयोग प्रश्न तयार करताना मागच्या प्रश्नांचा अंदाज घेऊनच तयार करत असतो हे लवकर कळायला हवं आपल्याला 🌿
01.05.202505:05
50 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सुरु केलेला हा प्रवास आज 50 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला आहे...मायबाप विद्यार्थ्यानो तुमच्या प्रेमाशिवाय हे कधीही शक्य नव्हतं... आम्ही कायम तुमच्या ऋणात आहोत आणि तुम्ही तुमच्या ऋणातून आम्हाला कधीही मोकळं करू नका.. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद पोरांनो..!!🌿❤️
16.04.202504:06
1 जून गट क पूर्व परीक्षा आणि 29 जून गट ब मुख्य परीक्षेच्या निमित्ताने पुढचे काही दिवस :-

1. गट क पूर्व परीक्षेसाठी शेवटचे 45 दिवस आहेत आणि गट ब मुख्य परीक्षेसाठी शेवटचे 75 दिवस आहेत.

2.तुमची भयंकर महत्वाची वेळ सुरु आहे किमान एवढं तरी भान तुम्हाला हवं.

3.अभ्यास सोडून बाकी इतर सर्व क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टींपासून लांब रहा.

4. हातात खूप कमी वेळ आहे आणि या कमी वेळात बराच अभ्यास करणं अपेक्षित असतं.

5. या दिवसामध्ये फक्त स्वतःमध्ये गुंतून रहा... अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्याच गोष्टीसाठी कोणाला वेळ देऊ नका...

6. इथून पुढे अभ्यास करताना तुम्हाला दिवस कमी पडत असेल तर तुम्ही बरोबर दिशेने जात आहात.

7. Revision आणि Question Practice या दोनचं गोष्टी तुम्हाला निकालात आणू शकतात हे मी वारंवार सांगितलंय.

8. सगळ्यात महत्वाचं की मोबाईल पासून शक्य तितकं लांब रहा... सगळ्यात जास्त वेळ इथंच जातो आपला.

9. तुम्हा सगळ्यांना चांगल्या-वाईट गोष्टी कळतात आणि हे सगळं कळत असूनही तुम्ही न कळल्यासारखं वागत असाल तर येणाऱ्या काळात बराच त्रास सहन करावा लागेल..

10. पास होण्याची क्षमता असतानाही अनेकजण भरकटताना दिसत आहेत... किमान आत्ता तरी स्वतःमध्ये बदल करा 🌿❤️

@रेवण..
29.03.202511:06
https://youtu.be/9bmLhfYt2gQ?si=HgTxQR01-QYcQTpB

1 जून संयुक्त गट क पूर्व परीक्षा
राहिलेल्या 60 दिवसांचे नियोजन कसे करायचे??

किती Revision करायच्या??

किती टेस्ट पेपर सोडवायचे??

कोणत्या चुका टाळायच्या??

70+ मार्क्स कसे घ्यायचे??

एकूण घ्या...फायद्याचं आहे..!🌿❤️
20.03.202513:01
आज काही बोलणार नाही..!!❤️

भरून पावलो.. 🌿❤️

योग्य दिशेला कष्टाची साथ मिळाली की विजय निश्चित असतो..!!
दिखाया गया 1 - 24 का 25
अधिक कार्यक्षमता अनलॉक करने के लिए लॉगिन करें।